कळमेश्वर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित

✒अनिल अडकिने✒
सावनेर प्रतिनिधी
9822724136
सावनेर, दि.14 ऑगस्ट:- तहसील कार्यालय कळमेश्वर येथे कृषी विभागाच्या वतीने रान भाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.श्री.सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमात पाहुणे मंडळीची उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत सभापती दादासाहेब भिंगारे पंचायत समिती कळमेश्वर, मनोहर कुंभारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष.अनुराग मॅडम कृषी अधिकारी कळमेश्वर उपस्थित होते.
या रानभाजी महोत्सवात कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी बांधव. कृषी सेविका ,आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील 7 व्या सत्रातील विद्यार्थिनी कु. रोशनी बुटे, कु. ऐश्वर्या गिलोरकर,कु.यामिनी करडभाजने, स्वाती ठाकरे कु.पल्लवी उपासे,व रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिपरी वर्धा येथील कु. स्नेहल गिरे सहभागी होते. माननीय सुनील बाबू केदार यांनी रान भाजी चे महत्व भाषणाद्वारे थोडक्यात पटवून दिले त्यांनी सांगितले की या रानभाज्या चा प्रसार करण्याकरता व्यापक उपाययोजना राबविणार.