*रोड अपघात मद्ये जागीच मृत्यु *

मुकेश शेंडे
(मिडिया वार्ता न्यूज़ )
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8855084555
सिंदेवाही: पासून ६ किलोमिटर असलेल्या पळसगाव(जाट) येथील रहिवासी असलेले रोशन गील वय ३० वर्ष या युवकाचे दिनांक १३/०८/२०२१ च्या रात्री ११:३० च्या सुमारास स्वतःच्या गाडी वरचा ताबा सुटल्याने सदर गाडी रस्त्यावरून शेतात गेली.व रात्री ची वेळ असल्याने या अपघात मध्ये रोशन गील यांचा जाग्यावर मृत्यू झाला.हा अपघात झाल्याची बातमी सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांच्या लक्षात आली.व लगेच गावातील पोलिस पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.पुढील तपास सुरू आहे.