सीमापार करून रायगडात घुसखोरी; दोन बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात”

सीमापार करून
रायगडात घुसखोरी; दोन बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात”

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे इंदापूर गावातील सहकारनगर भागात छापा टाकत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींनी कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा भारत सरकारकडून मान्यता मिळालेली कागदपत्रे बाळगली नव्हती. हे दोघे बांगलादेशातून चोरट्या मार्गाने भारतीय सीमेत घुसखोरी करून अनधिकृत वास्तव्य करत होते.

अटक आरोपीं मध्ये
माधिला जहांगीर आलम (३८), रा. ग्राम मेरेडिया भूईयापारा, पोस्ट खिळगाव, राज्य ढाका, बांगलादेश
रसेल फारूक हुसेन (२९), रा. ग्राम श्रीरामपूर, पोस्ट झिगरगाछा, जि. जसोर, बांगलादेश यांना
अटक करण्यात आली. दोन्ही घुसखोरांना पुढील कार्यवाहीसाठी परकीय नागरिक नोंदणी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक टी.आर. घमोडे, सहायक फौजदार संजय ठकूर, पो. हवालदार कैलाश टेमकर, म. पो. हवालदार रदसक सुतार, पो. शिपाई श्रेयस म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण मोहिम पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.