सुतारवाडी-केवनाळे दरडग्रस्त ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन मागे; नामदार भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपामुळे दिलासा

सुतारवाडी-केवनाळे दरडग्रस्त ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन मागे; नामदार भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपामुळे दिलासा

आपली माती आपली माणसे संघटनेला आलेली यश

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सातत्याने लढा दिला आहे. 2021 साली आलेल्या महाप्रलयात या भागातील अनेक घरे नष्ट झाली होती, काहींनी आपले प्राण देखील गमावले होते. शासनाने तात्पुरत्या स्वरूपात मदत दिली, कंटेनर स्वरूपात निवारा उपलब्ध करून दिला. शासनाने या जागी मराठी शाळा व्यायामशाळा सभागृह अंगणवाडी बस स्टॉप डांबरी रस्ते या नागरी सुविधा केल्या मात्र चार वर्षांनंतरही पक्की घरे न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.

या पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त झालेल्या सुतारवाडी व केवनाळे ग्रामस्थांनी प्रशासकीय इमारतीसमोर चिता रचून आत्मदहन करण्याची तयारी सुरू केली होती.

परंतु स्वातंत्र्यदिनाच्या आदल्यादिवशी, नामदार भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपामुळे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. प्रांताधिकारी नरेंद्र ओमासे, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, पोलादपूर एपीआय आनंद रावडे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख अनिल मालुसरे, व आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक श्री. राज पार्टे व अध्यक्ष निलेश दादा कोळसकर यांच्या उपस्थितीत ही चर्चा पार पडली.

ग्रामस्थांचा ठाम आग्रह होता की निर्णय त्यांच्या डोळ्यांदेखत आणि त्याच ठिकाणी घेण्यात यावा. त्यानुसार नामदार भरत गोगावले स्वतः घटनास्थळी आले आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. चर्चेअंती नामदार गोगावले यांनी महत्त्वाची घोषणा केली की:

दरडग्रस्त सुतारवाडी (44 घरे) व केवनाळे (128 घरे) या दोन्ही गावांतील बाधितांसाठी शासनाकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त दहा लाख रुपये, असा एकूण 12.5 लाख रुपयांचा निधी मिळवून येणाऱ्या एका वर्षात चांगल्या दर्जाची घरे उभारली जातील, असा शब्द दिला.

या घोषणेनंतर आपली माती आपली माणसं संघटना, ग्रामस्थ व आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. याच ठिकाणी नारळ फोडून भूमिपूजनही करण्यात आले, व नामदार भरत गोगावले, तसेच संपूर्ण प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

ही बैठक आणि निर्णय ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि संघटित प्रयत्नांचा विजय ठरला आहे. यामध्ये आपली माती आपली माणसं संघटनेचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले
नामदार भरत गोगावले
प्रांताधिकारी नरेंद्र ओमासे
तहसीलदार कपिल घोरपडे
गटविकास अधिकारी दीप्ती गाट
पोलादपूर एपीआय आनंद रावडे
माजी जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे व अन्य राजकीय पक्षांचे नेते मंडळी व
आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक श्री राज पार्टे
अध्यक्ष निलेश दादा कोळसकर
व साखर सुतारवाडी व केवनाळे येथील शेकडो ग्रामस्थ
ही घटना प्रशासन आणि जनतेमधील संवादाचा उत्कृष्ट नमुना ठरली असून येत्या एक वर्षाच्या काळात या आश्वासनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.