भव्य सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी.

भव्य सत्कार समारंभ
भारतीय जनता पार्टी.

नवनिर्वाचित पदाधिकारी बंधू-भगिनींचा भव्य सत्कार समारंभ.

सुनील भालेराव.
अहिल्यानगर. (शिर्डी.)
मो. नं.9370127037.

दिनांक 14/8/2025.
अहिल्यानगर. भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडळ, पश्चिम मंडल तसेच शहर कार्यकारणी या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी बंधू-भगिनींचा भव्य सत्कार समारंभ. व्हीआयपी गेस्ट हाऊस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सहजानंद नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे मा. श्री.बिपिनदादा शंकरराव कोल्हे साहेब यांची उपस्थिती लाभली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री विवेक भैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ पार पडला याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राहण्याचा योग आला याप्रसंगी पेरेंट अध्यक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती अल्पसंख्याक मोर्चा नियुक्त झालेले सर्व अध्यक्ष सचिव आणि सदस्यांचा सत्कार करून सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपण सर्वांनी मिळून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. असा संकल्प करून तयारीला लागायचे आहे. आणि आपला बुथ सर्वात मजबूत करायचा नारा याप्रसंगी दिला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.