विधान भवन मुंबई येथे मराठी भाषा समितीची बैठक.
आमदार मा. श्री.आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेची बैठक विधान भवन येथे.
सुनील भालेराव.
अहिल्यानगर.(शिर्डी.)
मो. नं.9370127037.
अहिल्यानगर.दि. 14/8/2025. रोजी कोपरगाव तालुक्याचे आमदार मा. श्री.आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीची बैठक पार पडली.
यावेळी मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार मा. श्री.मनोज घोरपडे, मा.श्री.सत्यजित देशमुख, मा. श्री.रमेश बोरणारे, मा.श्री.कैलास पाटील, मा.श्री. संजय केनेकर, मा श्री.जगन्नाथ अभ्यंकर, मंत्रालय मराठी भाषा विभागाचे सचिव मा. श्री.किरण कुलकर्णी, सहसचिव मा.डॉ. नामदेव भोसले, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाचे सचिव मा.डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मा. डॉ.मीनाक्षीताई पाटील विधिमंडळ मराठी भाषा उपविभागाचे उपसचिव मा.श्री. मोहन काकड, पक्ष अधिकारी मा. श्री. जीवन गावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मा. श्री.राजेंद्र भोयार, उपविभागीय अभियंता
मा. श्री.अण्णासाहेब शिरसाट आदी उपस्थित होते.