मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेन मधून पडून महिलेचा मृत्यु, गोवे गावानजिक दुर्दैवी घटना….

मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेन मधून पडून महिलेचा मृत्यु, गोवे गावानजिक दुर्दैवी घटना….

रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो.7722040387

बुधवार दि.१३/८/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई बाजू कडून मंगळुकडे बाजू कडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडी क्रमांक १२६१९ या रेल्वेने प्रवास करणारी महिला गोवे गावाच्या हद्दीतील रेल्वे पोल क्र ७/३५ रेल्वे पटरी जवळ रेल्वेतून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते,कोलाड पोलीस तसेच रेस्क्यू (SVRSS) टीम घटना स्थळी दाखल झाली यांच्या मदतीने मृत्यूदेह ताब्यात घेण्यात आला सदर महिलेची ओळख पटली असुन या महिलेचे नाव सविता हिरालाल मखवाना वय वर्षे ३० असुन रा.मेघानी,नगर शेरी-७रणपूर, अमहदाबाद, गुजरात येथील आहे.या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस. जी. भोजकर करीत आहेत…