गायीला डूबताना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणांचा करून अंत

50

गायीला डूबताना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणांचा करून अंत

गायीला डूबताना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणांचा करून अंत
गायीला डूबताना वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणांचा करून अंत

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953

चिमुर (पवनी) : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,पवनी तालुक्यातील वाही या गावातील एक दुर्देवी घटना समोर आली आहे. घरची गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी परतत असताना त्याची एक गाय तलावाच्या पाण्यात गेली असल्याचे त्याच्या लक्षात येताच तिला वाचवण्यासाठी तरुण गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तरुणाने आपला जीव गमावला आहे. रुपेश उर्फ वैभव रघुनाथ शहारे (वय 17) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश शहारे हा तरुण शुक्रवारी दुपारी गाव तलावाकडे त्याच्या गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र सायंकाळी घराकडे परत येत असताना त्याच्या गुरांपैकी एक गाय तलावाच्या पाण्यात गेली. तिला वाचवण्यासाठी रुपेश तलावात उतरला. परंतु त्याला पाणी खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. दरम्यान रुपेश आणि त्याची गाय दोघेही पाण्यात बुडाले.

दरम्यान, रुपेश हा जनावरे घेऊन घरी परत न आल्यामुळे शोधाशोध सुरू झाली. त्याच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तलावाकडे धाव घेतली. त्यावेळी सर्वांनी शोधाशोध केली असता त्यांना तलावात गायीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे रुपेशही तलावात बुडाला असावा अशी शंका आली. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्याचा तलावात शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेच दिसला नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी गावकऱ्यांनी पुन्हा निष्टी आणि वाही येथील ढिवर बांधवाच्या मदतीने तलावात शोधाशोध सुरू केली. तेव्हा सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रुपेशचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात पवनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश बिसने आणि पोलीस पथक तपास करीत आहे .