घुग्घुस शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक बंद करा आम आदमी पार्टीची मागणी

49

घुग्घुस शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक बंद करा: आम आदमी पार्टीची मागणी

घुग्घुस शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक बंद करा* *आम आदमी पार्टीची मागणी*
घुग्घुस शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक बंद करा: आम आदमी पार्टीची मागणी

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५

घुग्घुस:-  शहरांमधून होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील प्रदूषण अत्यंत जोमाने वाढत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तसेच जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्गाची सुद्धा दूरावस्था झालेली आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. ज्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच त्यांना नियमानुसार देण्यात आलेला मार्ग हा दुसरा आहे तरीसुद्धा शहरातील मुख्य मार्गाचाच वापर होत आहे.

त्यामुळे आम आदमी पार्टी घुग्घुसतर्फे पोलीस पोलीस स्टेशन येथे निवेदनातून मागणी करण्यात आली. यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सहसचिव विकास खाडे, सागर बिऱ्हाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, अभिषेक तालापेल्ली, संदीप पथाडे, दिनेश पिंपळकर, सोनू शेटियार, प्रशांत सेनानी, रवी शांतलावार, संतोष सलामे, धनराज भोंगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.