नांद आणि वडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
नदीकाठच्या जनतेनी सावध राहण्याचे एस डी ओ शिल्पा सोनोने यांचे आवाहन !

नदीकाठच्या जनतेनी सावध राहण्याचे एस डी ओ शिल्पा सोनोने यांचे आवाहन !
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट १४/०९/२१
वडगाव आणि नांद या दोन्ही धरणाचे दरवाजे आज सायंकाळी उघडण्यात आल्याने वणा नदीच्या पात्रात या धरणाच्या पाण्याचा विसर्ग होणार असल्याने वणा नदीच्या काठावर राहणाऱ्या जनतेनी सावध राहण्याची सूचना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केली आहे.
आज दि 14 ला सायंकाळी 5 वाजता वडगाव धामचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत तर नांद धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्याने या धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होणार आहे.त्यातच नागपूर ,बीटीबोरी या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने व या भागातून येणारे पाणी हे थेट या दोन्ही धरणक्षेत्रात जमा होत असल्याने व ही दोन्ही धरणे सद्य स्थितीतीत पूर्ण भरलेली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करणे हे गरजेचे असल्याने वणा नदीच्या काठावरील जनतेने स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती शिल्पा सोनाले यांनी केली असून प्रशासन पूर्णतः काळजी घेत असून सध्या कोणताही धोका नाही हे त्यांनी स्पष्ट केले मात्र रात्रीतून मुसळधार पाऊस झाल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे संभाव्य धोक्याच्या सूचना शिल्पा सोनाले यांनी देऊन जनतेला सावध केले आहे.