मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.
मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.

मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.

अष्टविनायकांपैकी रांजणगाव महागणपतीचा चौथा गणपती.

मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.
मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.

रांजणगाव:- आज आपण रांजणगावच्या महागणपतीच दर्शन करणार आहोत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पावन अशा अष्टविनायकांपैकी महागणपती हा चौथा गणपती आहे. पुणे जिल्हातील शिरूर तालुक्यात महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या अष्टविनायकाला ओळखले जाते. मूळ मूर्तीला ‘महोत्कट’ म्हटले जाते. त्याच्या दर्शन मात्राने मनुष पावन होतो. मनात कार्यक्षम उर्जा निर्मित होते. भक्ती भावाने मनात अगदी नवचैतन्य संचारतो. महागणपती हा नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. 10 व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.

गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले व येथे शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्यावेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले.

मिडिया वार्ता न्यूज तर्फे अष्टविनायका तुझा महीमा कसा, आज रांजणगाव महागणपतीचा महिमा.
 रांजणगावचा  महागणपती

धर्मीक आख्यायिका :
हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुराने
श्री गजाननाची आराधना करत त्यांना एक वरदान मागितले. भगवान शंकराशिवाय माझा कुणीही वध करू शकणार नाही, कोणताही देव मला हरवू शकणार नाही, असे त्याला वरदान प्राप्त झालेे. यानंतर त्रिपुरासुर उन्मत्त झाला. देवांचा पराभव करून त्याने कैलासाकडे कूच केले. भगवान शंकर आणि त्याच्यात तुंबळ युद्ध झाले. यात गजाननाचे स्मरण करत शंकराने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. याच दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.

मूर्तीची वैशिष्ट्ये : दोन मूर्ती
मंदिरातील गाभाऱ्यात शेंदूर लावलेली महागणपतीची मोठी मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. दक्षिणायन व उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे गाभाऱ्यातील गजाननावर पडतील अशी मंदिराची रचना असल्याने या कालावधीत मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. मूर्तीच्या खालच्या बाजूस तळघर असून त्यात महागणपतीची आणखी एक मूर्ती आहे. या मूर्तीला दहा सोंड व वीस हात आहेत. मंदिराचा गाभारा हा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. पेशव्यांची या गणपतीवर श्रद्धा होत.

मंदिराचे वैशिष्ठ्य:

रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्ह काळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून, दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here