रेड्यांची टकरा,चौघांवर गुन्हा दाखल*

63

*रेड्यांची टकरा,चौघांवर गुन्हा दाखल*

रेड्यांची टकरा,चौघांवर गुन्हा दाखल*
रेड्यांची टकरा,चौघांवर गुन्हा दाखल*

सतीश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010

जालना तालुक्यांतील पिरकल्याण येथील स्मशानभूमी जवळील सरकारी गायरानात पैशावर झुंज लाऊन जुगार खेळणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली, शेख चिग्या, शेख गफार (जामवाडी )चांदभाई (देवमुर्ती) सैय्यद मुजबी सय्यद रफिक (देवमुर्ती) किशोर कदम (धारकल्यान )अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 6 टेम्पो 2 कार सह 16 लाख 50 हजारांचा मुदेमाल जप्त करण्यात आला, पिरकल्याण येथे रेड्यांची झुंज लावून काही जण जुगार खेळत असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली, बंदी असतानाही रेड्यांची झुंज लावल्या जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी चारही आरोपींना तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.