सिन्देवाही येथे “आप” ची बैठक संपन्न* *

40

*सिन्देवाही येथे “आप” ची बैठक संपन्न* *

सिन्देवाही येथे "आप" ची बैठक संपन्न* *
सिन्देवाही येथे “आप” ची बैठक संपन्न* *

मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि, सिंदेवाही
मिडिया वार्ता न्यूज़

सिंदेवाही : -येना-या सिन्देवाही—लोनवाही नगरपंचायत च्या निवडणूकीची पूर्व तयारी म्हणून आज आम आदमी पार्टी सिन्देवाही तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले .त्यात प्रामुख्याने तालुका व शहर कार्यकारणी गठीत करुन प्रभाग निहाय समित्या स्थापन करण्याचे ठरविण्यात आले . बीजेपी काँग्रेसला जनता कंटाळली आहे व आम आदमी पार्टीकडे एक ईमानदार राजकीय पर्याय म्हणून जनतेचा कल आहे. दिल्ली मधील कामे व भारतात आपची वाढती लोकप्रियता बघता जनतेला त्यांच्या हिताचे काम करणारी एकमेव पार्टी म्हणून आम आदमी पार्टीकडे जनतेचे लक्ष लागून आहे व जनतेच्या विश्वासाला आम आदमी पार्टी पात्र ठरली आहे . येणा-या निवडनुकीत आम आदमी पार्टी ला सहकार्य करावे असे आवाहन या प्रसंगी करन्यात आले ही सभा श्री मनोहर पवार विदर्भ कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. विजय सिद्धावार विधानसभा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व श्री.सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. व यावेळी श्री हीरालाल इंदोरकर अध्यक्ष स्थानी होते. तसेच सभेला प्रमुख उपस्थिती सोशल मिडीया प्रमुख राजेश चेडगुलवार महानगर पदाधीकारी चंदु माडूरवार,अश्रफ संय्यद भाई,वंदना गजभीये,वीलास गंडाटे,चंदु गंडाटे,रामाजी मोहूर्ले,मंगला बोरकुंडवार,अरुण नागदेवते,प्रवीण मौहूर्ले,खटूजी गुरनुले,ऊध्दव लोखंडे,किशोर मेश्राम,भाग्यश्री हांडेकर,सुनीता मडावी,बाबुराव पेंदाम,गोमाजी मस्के,सुभाष कोलप्याकवार व ईतर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.