*” त्या ” उत्साही युवकाचा शोध घ्या ;आमदारांचा कार्यकर्त्यांना सूचना ;शक्य ती मदत करू आ.धोटे*

52

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी :- पत्र लिहिणारा हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो, याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे, तर दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना या उत्साही युवकाचा शोध घेण्यास त्यांनी सांगितले असून, तो सापडल्यास शक्य ती मदत करता येईल, असे आमदार धोटे यांनी सांगितले.असे निनावी पत्र लिहून दिशाभुल करण्याचा प्रकार योग्य नसल्याची खंत आ.धोटे यांनी व्यक्त केली.
आजकाल सर्वत्र रोजगाराच्या संधी आटत चालल्या. लोकांच्या जगण्याचे वांधे झालेत. अशा स्थितीत या तरुणाला भलतीच चिंता सतावत आहे. आता त्याची चिंता किती गांभीर्याने घ्यायची, असा प्रश्न निर्माण झालाय.
मुली भाव देत नाही म्हणून चिंतामग्न तरूणाने थेट आमदारानांच पत्र लिहिले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. पत्रातून अजब व्यथा व्यक्त करणारा हा युवक अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे हे पत्र किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्नच आहे. मात्र या व्हायरल पत्राने धमाल उडवली, एवढं मात्र नक्की.