माणगांव तालुक्यातच नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्यात गुटखा व काळा गूळ याची जोरदार विक्री चालू आहे अन्न ओषध प्रशासनांचे दुर्लक्ष

✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यात गुटखा व काळ्या गुळाची जोरदार विक्री सध्या सुरु असून रायगड अन्न ओषध प्रसासन विक्रीकडे अक्षरशः दुर्लक्ष करीत आहेत. गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असताना सुद्धा राजरोसपणे त्याची विक्री माणगांव तालुक्यात शहरांत तसेच इंदापूर, लोणेरे, गोरेगाव, त्याच प्रमाणे इतर तालुक्यात व ग्रामीण भागात प्रत्येक टपरीवर तसेच किराणा माळाच्या दुकानात गुटखा हा विकला जात आहे.गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे या मध्ये स्त्रीमध्ये तरुणी सुद्धा आता मोठया प्रमाणात गुटखा खाताना दिसत आहेत.
माणगांव शहरात,इंदापूर शहरात तर बाजार पेठेत काही किराणा मालाच्या दुकानदार व एंटरप्रायजेस स्टोर मध्ये तसेच पान टपरीत गुटख्याची मोठया प्रमाणात विक्री होत असून इंदापूर भर बाजारपेठेत गावठी दारूसाठी लागणाऱ्या काला गुळ बिनदास्त पणे कोणालाही नं घाबरता विक्री करत आहे त्यांनी तर इंदापूर जवळ काही अंतरावर एक घरच गोडावून करून ठेवला आहे. त्याच प्रमाणे माणगांव शहरात सुद्धा काळ्या गुळाची विक्री जोमाने सुरु ठेवली आहे. गावठी दारूमुळे अनेक घर उद्वस्थ झाली आहेत त्याचप्रमाणे अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बेकायदेशीर धद्याना आळा घालण्यासाठी संबंधित रायगड अन्न औषध प्रसासन अपयशी ठरत असून याबाबत जनते मध्ये संबंधित शासकीय अधिकारी याचा तालुक्यावर विभागावर वरद्धहस्त नसल्याने हे बेकायदेशीर धंदे राजरोपणे सुरु आहेत. असे देखील काही सामाजिक कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात गुटखा विक्रीचे त्याच प्रमाणे काळ्या गुळाची विक्री कितपर्यंत चालणार आहे. तसेच गुटखा विक्रीचे मुख्य केंद्रबिंदू म्हसळा शहर असून काही दुकानदाराच्या तोंडून दबक्या आवाजात एकण्यात येत आहे. त्याच प्रमाणे हा गुटखा किंग सकाळी तीन ते चार वाजता आपले गुटखा पार्सल हे आपल्या आलिशान फोर व्हीलर गाडीने घेऊन इंदापूर व माणगांव येथे काही ठराविक दुकानदाकडे येत असून आपला गुटख्या चा माल दुकानदाराला घोषवत असतो असे देखील खात्रीशीर वृत्त समजते.
माणगांव तालुक्यातील काही किराणा मालच्या दुकानातील काळ्या गुळाच पर्दापाश केला तर हातभट्टी वर चालणारी गावठी दारू ही कायमचीच बंद होईल याकडे अन्न ओषध प्रशासनाने व विभागाच्या अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन अवैध धंद्याना आळा घालावा नाहीतर याची तक्रार माणगांव तालुक्यातील सामाजिक संस्था व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगांव तालुका पत्रकार संघ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत.