आर्यन आदिवासी फाउंडेशन महिला आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष प्रमिला पदमन तरसे यांची नियुक्ती

सौरभ कामडी 

मोखाडा प्रतिनिधी

दि.१२ सप्टेंबर रोजी आर्यन आदिवासी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक / अध्यक्ष कुंदन गुरुनाथ टोकरे यांच्या नेतृत्वाखाली वाडा विश्रामगृह येथे सभा आयोजित केले होते. ते सभेदरम्यान वाडा तालुक्यातील डॅशिंग कर्तव्यदक्ष तडफदार महिला सामाजिक कार्यकर्ती त्यांची आदिवासी समाजामध्ये काम करण्याची तळमळ पाहता प्रमिला पदमन तरसे यांची आर्यन आदिवासी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पालघर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्राचे राज्य संस्थापक/ अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

   गेल्या तीन ते चार वर्षापासून आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे काम करण्याची पद्धत पहिले आहे. हे आर्यन आदिवासी फाउंडेशन आदिवासी गोरगरीब जनतेचे अन्याय त्याच्याविरुद्ध , तसेच महिला च्या अत्याचार विरुद्ध विविध विकास कामासाठी पाठपुरावा करत आहे. ड्यशिंग नेतृत्व संस्थापक कुंदन टोकरे तसेच आर्यन आदिवासी फाउंडेशनच्या कामावर विश्वास ठेवून आज मी फाऊंडेशन मध्ये जाहीर प्रवेश केला.

      गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पालघर जिल्ह्यातील महिलांवर , गोरगरीब जनतेवर अत्याचार करण्यात विरुद्ध काही संघटनेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठत होते. परंतु त्या संघटनेचा फारसा काही मला पाठिंबा मिळत नव्हता परंतु आज आर्यन आदिवासी फाउंडेशन प्रत्येक पदाधिकरेच्या पाठीशी ठामपणे उभी राहून काम करत आहे, असे जर आर्यन आदिवासी फाउंडेशनचा आम्हाला सहकार्य लाभले तर नक्कीच सर्वांच्या सहमतीने आदिवासी महिलांना, गोरगरीब जनतेला, विविध विकास कामासाठी पाठपुरावा सरकारी योजना विषयी महिला सबलीकरण असे इत्यादी कामावर आपण आवाज आवाज उठून आदिवासी जनतेला न्याय देऊ शकते. असे यावेळी बोलताना सांगितले.

 यावेळी उपस्थित आर्यन आदिवासी फाउंडेशनचे संस्थापक कुंदन टोकरे, सचिव संदीप महाकाळ, खजिनदार राजकुमार डवले, महाराष्ट्र राज्य सदस्य तेजस नानवे, कुणाल टोकरे, पालघर जिल्हा अध्यक्ष संदीप भुजारे, वाडा तालुका अध्यक्ष अविनाश शिंदे , इतरही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here