लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातून ग्राम. कासटवाडी येथे आयुष्मान कार्डचे वितरण

सौरभ कामडी 

मोखाडा प्रतिनिधी

दि.१३ सप्टेंबर 2023 रोजी जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासाट वाडी चे लोकनियुक सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून कासाट वाडी पैकी गणेश नगर येथे आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले.

 गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ यांना तालुक्यात जावे लागत होते पण आम्ही ग्रामपंचायत नी निर्णय घेतला की आपल्या गोर गरीब जनतेला तालुका ठिकाणी जाण्यासाठी खुप मोठी अडचण निर्माण होत होती म्हणून आम्ही तो ग्रामपंचायत मध्ये आयुषमान कार्ड वितरण केले. आभा ओळखपत्र तयार करणे, आरोग्य योजना आणि सेवांविषयी माहिती देण्यात आली प्रसंगी माजी महिला व बालकल्याण सभापती .गुलाब विनायक राऊत,लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत, ग्राम. सदस्य कल्याणी राऊत, उपकेंद्र गरदवाडी आरोग्य अधिकारी कोमल गायकवाड ,नर्श, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here