चोपडा तालुक्यात आनंदाचा शिधा वितरणास सुरुवात, आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरणास शुभारंभ 

मन्सूर तडवी

जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक १३/९/२३ रोजी शासकीय विश्राम गृह येथे तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरणास आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, चोपडा भाग उपविभागीय अधिकारी बंगाळे, नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर, गोदाम व्यवस्थापक योगेश नन्नवरे, पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन आदिंसह इतर अधिकारी व कर्मचारी आदिंसह इतरांची उपस्थिती होती.

संपुर्ण चोपडा तालुक्यामध्ये एकूण ४६८०८ लाभार्थी यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात येणार असून त्यामध्ये चना डाळ, रवा, साखर व खाद्यतेल समाविष्ट असून पात्र लाभार्थी यांना तातडीने वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे..

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, मंगलाताई पाटील, शितल देवराज, कैलास बाविस्कर, राजेंद्र पाटील, रमेश ठाकुर, प्रकाश राजपूत, अशोक पाटील, दशरथ बाविस्कर, गणेश पाटील, प्रताप पावरा, किरण करंदीकर, भास्कर पाटील, दिपक कोळी, प्रविण देशमुख, दिव्यांक सावंत, नंदु गवळी, संदीप कोळी, मुकेश कोळी आदिंसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने पात्र लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here