चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी, मालमत्ता करात मिळवा ‘इतकी’ मोठी सूट

62

चंद्रपूरकरांनो तुम्ही भरलाय का मालमत्ता व पाणी कर ? ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करात १० टक्के सुट. शासकिय सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता व पाणी कर

अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर,१४ सप्टेंबर: ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही मनपाची कर संबंधित कार्यालये सुरु राहणार असुन एकमुस्त कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात येत असल्याने त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट योजना मनपातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

या महिन्यात १६,१७,२३,२४ व ३० सप्टेंबर अश्या ५ शासकीय सुट्ट्या असुन सुटीच्या दिवशी अनेकांना विशेषतः नौकरदार वर्गाला कर भरणे सोयीचे जाते.अधिकाधिक कराचा भरणा व्हावा यादृष्टीने कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असुन सुटीच्या दिवशीही काम करण्याचे निश्चित केले आहे.


अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे तसेच ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे. एकुण मालमत्ता करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर व पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.