चोपडा तालुक्यातील मोहरद ते कुंड्या पाणी शिवारात अवैध झोपड्या व अतिक्रम करणाऱ्यास हूसकावले

मन्सूर प्रतिनिधी

चोपडा प्रतिनिधी

11/09/2023 वनक्षेत्र अडावद परिमंडळ कुंड्या पाणी नियतक्षेत्र चिचपाणी या कंपार्टमेंट नंबर 152 मधील अज्ञात लोकांनी जंगलात अवैध बांधलेल्या झोपड्या दिनांक 07/09/2023 रोजी म. वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद व स्टाफ च्या मदतीने नष्ट केल्या होत्या परत रात्री बेरात्री कंपार्टमेंट नंबर 152 मध्ये नवीन झोपड्या बांधल्याची माहिती मिळाली लागलीच मोहरद गावातील स्थानिक आदिवासी लोकांना घेऊन चांदण्या तलाव जंगलामध्ये जाऊन नवीन बांधलेल्या 6 झोपड्या नष्ट करण्यात आल्या मोहरद या गावातील स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे की आम्ही कोणतेही अवैध वृक्षतोड अतिक्रमण होऊ देणार नाही. तसेच आज पर्यंत वन दावा जमिनीबद्दल कोणतीच ग्रामसभा झालेली नाही तसेच ज्या वन हक्क समित्या स्थापन केल्या त्या कोणत्या तारखेला स्थापन केल्या गेल्या आहेत त्या अंधी कृत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे कारण की नवाड जमिनीबद्दल या विषयावरील गावात केव्हाच एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही जर परस्पर ग्रामसेवकाने समित्या स्थापन केल्या असतील तर त्या ग्रामसभा मध्ये किती ग्रामस्थांच्या सह्या आहेत कोणत्या ठिकाणी ग्रामसभा घेतली त्या अधिकाऱ्यांची नावे ग्रामसभा चे फोटो किती अधिकारी हजर होते त्यांची नावे नाहीतर गट विकास अधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी या समित्या लवकरात लवकर बरखास्त करण्यात याव्या असे स्थानिक ग्रामस्थ आदिवासी यांचे म्हणणे आहे.

सदर जंगल भागात ड्रोन उडवण्यात आले व चांदण्यात तलाव मोहरद ग्रामस्थांच्या समोर मीटिंग घेऊन जंगलात कोणीही अवैध झोपडी बांधणी अतिक्रमण वृक्षतोड करेल त्याच्यावर वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल. सदरची कार्यवाही मा. प्रवीण ए साहेब उपवनसंरक्षक यावल,मा. प्रथमेश हडपे साहेब सहाय्यक वनसंरक्षक चोपडा मा. आनंदा पाटील साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी अडावद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कार्यवाही ड्रोन चालक राजू बोंडल वनरक्षक लोहारा संपूर्ण कुंड्या पाणी राउंड स्टाफ संरक्षण मजुर मोहरद गावातील ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आली तसेच सदर घटनेबाबत वनरक्षक चिंचपाणी यांनी गुन्हा नोंद केला.

जनतेला आव्हान करण्यात येते की कोणीही जंगलामध्ये अवैध अतिक्रमण झोपडी बांधणे शिकार वृक्षतोड करत असेल तर टोल फ्री क्रमांक 1926 वरती कळवावे किंवा नजीकच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे कळवावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here