एवरेस्ट अबॅकस अकॅडमी ची २२ वी नॅशनल ऑनलाइन कॉम्पिटिशन स्पर्धा…

सचिन पवार 

कोकण विभाग प्रतिनिधी 

 मो: 8080092301

माणगांव :-माणगाव दिनांक १०/०९/२०२३ विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकासामध्ये प्रचंड वाढ करण्याच्या उद्देशाने माणगाव स्काय व्ह्यू अपार्टमेंट मध्ये एव्हरेस्ट अकॅडमी चे शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहे आणि फिंगर थेअरी शिकवणारी भारतातील पहिलीच अकॅडमी आहे २०/०८/२०२३ रोजी नॅशनल लेवल ऑनलाईन कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये भारतातून ४७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपल्या क्लास मधून सहा विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये सहाच्या सहा विद्यार्थी रँक मध्ये आल्याने सर्व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले म्हणून या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आज दिनांक १०/०९/२०२३ रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार श्री अरुण दादा पोवार उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनंतसिंग राजपूत हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ नलिनी जमधाडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जमधाडे सर यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण दादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या विज्ञान युगात अबॅकस शिक्षणाचे महत्त्व खूप मोठे आहे कारण अबॅकसमुळे मुलांच्या दोन्ही मेंदूचा विकास होतो,बुद्धीची कार्यक्षमता वाढते,स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढीस लागते,रीडिंग रायडिंग स्पीड मध्ये वाढ होते म्हणून जास्तीत जास्त मुलांनी अबॅकस चे शिक्षण घ्यावे. 

नॅशनल लेव्हल ऑनलाईन कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेमध्ये रँक मध्ये आलेले विद्यार्थी -कु शौर्य शिवराज पंडरम रँक २ कु आयुक्ती संदीप गेडाम रँक ४कु ओवी अनंतसिंग राजपूत रॅंक ९, कु आर्या संदीप गेडाम रँक १०, कु स्वरांगी पंकज नागे एक्सलंट, कु आर्यन गणेश सानप बेस्ट, 

या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here