“कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ( नोंदणीकृत ) संस्थेने आयोजित केलेल्या व्यावसायिक प्रदर्शन आणि विक्री महोत्सव २०२३” भरघोस प्रतिसादात आणि भरगच्च गर्दीत गणपती सणाच्या खरेदीविक्रीच्या उत्साहात संपन्न

सचिन पवार 

कोकण विभाग प्रतिनिधी

मो: 8080092301

नालासोपारा :-कुणबी समाजातील व्यावसायिक बांधवांना संघटित करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली संस्था म्हणजेच, कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. या संस्थे मार्फत रविवार दिनांक १० सप्टेंबर , २०२३ रोजी सेंट अँथोनी हायस्कूल , नगिनदास पाडा , मोरेगाव , नालासोपारा ( पूर्व ) येथे आयोजित केलेल्या व्यावसायिकांच्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव २०२३ ला परिसरातील समाज बांधवांनी आणि नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. गणेश उत्सवाचे औचित्य साधून परिसरातील बांधवांना एकाच व्यासपीठावर आणून, कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या बांधवांना, वाजवी दरात सर्व साहित्य उपलब्ध केल्याने, उत्साहाचे वातावरण महोत्सवात निर्माण झाले होते . व्यावसायिक आणि खरेदीदार बांधवांचे समाधान हेच संस्थेच्या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे यश आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’, या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणेच, संस्थापक श्री अशोक जी वालम साहेब व अध्यक्ष श्री प्रेमनाथ जी ठोंबरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर जोमाने कार्य करीत आहे. ११०० छोट्या- मोठ्या उद्योजकांना साथीला घेऊन, सुरू झालेल्या संस्थेने, आज २००० उद्योजकांचा टप्पा पार करत आहे. भविष्यात हा आकडा ५,००० चा टप्पा पूर्ण करेल, असा अध्यक्षांना ठाम विश्वास आहे.

९ जुलै २०२३ रोजी, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय, गावस्कर हॉल येथे आयोजित केलेल्या व्यावसायिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हीच शृंखला पुढे नेताना रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी, नालासोपारा येथील सेंट अँथनी हायस्कूल येथे द्वितीय व्यावसायिक प्रदर्शन व विक्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात जवळपास १०० उद्योजकांनी सहभाग घेतला. अपुऱ्या जागेमुळे कित्येक उद्योजकांना, आम्हाला यात सहभागी करून घेता आले नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु संस्थेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि समाजबांधवांच्या मागणी नुसार संस्था भविष्यात मोठ्या व्यावसायिक बाजारपेठ विविध ठिकाणी उपलब्ध करुन व्यावसायिकांना मोठी चालना देण्याचे काम लवकरच सुरू करणार आहे. या सोहळ्यात सहभागी झालेले उद्योजक, आपल्या व्यवसायाची जाहिरात करत असतानाच, आपल्या शेजारील आपल्या बंधू-भगिनींच्या व्यवसायाची जाहिरात व विक्रीसाठी सहकार्य करताना दिसले. म्हणूनच व्यावसायिक क्षेत्रात, आपला समाजही नव अर्थक्रांती घडवून आणेल, असा विश्वास असल्याचे संस्थेने प्रसार माध्यमांना सांगितले.

या महोत्सवात समाजाचे प्रचारक म्हणून श्री. दीपक मांडवकर आणि श्री. मंगेश घडवले हे आवर्जून उपस्थित होते. या प्रदर्शनाला जवळपास तीन हजाराहून अधिक समाजबांधांनी, नागरिकांनी भेट दिली. व्यावसायिकांनी तसेच या कार्यक्रमास भेट देणाऱ्यांनी, असे कार्यक्रम येथे वारंवार व्हावेेत, अशा सूचना दिल्या. यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन अध्यक्षांच्या वतीने देण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या सर्व पदाधिकारी/सदस्य, जिल्हा अध्यक्ष, संपर्क कमिटी पदाधिकारी/सदस्य यांनी फार मेहनत घेतली. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व सदस्य रघुनाथजी कळभाटे, प्रकाशजी भोस्तेकर ,ॲड.अजयजी पाटील, ॲड. विनेशजी वालम, दयानंदजी चिंचवलकर, मॅडम हर्षाली धाडवे, ॲड. अवधूतजी तोरस्कर,महेशजी पारदुळे, पंकजजी पालकर,अशोकजी डफळे, महेशजी शिर्के, अशोकजी विशे, किसनजी बोंद्रे, सूनिलजी माळी, दत्तारामजी घाणेकर, अनंतजी फिलसे, आनंदजी राणे तसेच श्री . श्रीधरजी कदम यांनी अहोरात्र झोकून देऊन काम केले, यामुळेच हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी झाला. या महोत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी श्री . प्रकाश तुकाराम भोस्तेकर यांनी समर्थपणे पार पाडली. तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले अमूल्य योगदान देऊन, कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाचे योगदान दिले .या महोत्सवात स्थानिक तसेच कोकण , ठाणे , पुणे या परिसरातील कुणबी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. पदाधिकारी, व्यावसायिक व जमलेल्या बांधवांचे आभार प्रकट करताना, असेच सहकार्य वेळोवेळी, प्रत्येक ठिकाणी मिळो, अशी, संस्थापक श्री अशोक जी वालम साहेब व अध्यक्ष श्री प्रेमनाथ जी ठोंबरे साहेब यांनी आशा व्यक्त केली .

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले नाटककार, टिव्ही स्टार , दिग्दर्शक आणि समाजावर प्रचंड प्रेम असलेले श्री . सुनील माळी यांनी दिवसभर अत्यंत उत्कृष्टपणे केले. कुणबी समाज बांधवांच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी सन्माननीय संस्थापक श्री . अशोकदादा वालम यांनी सर्व सहकाऱ्यांना जवळ करून ही संस्था स्थापन केली . आज मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , शहापूर , पुणे , कोकण परिसरातून अनेक बांधव या संस्थेचे सभासद होत असून संस्था राबवित असलेल्या उपक्रमाला उत्सुर्त प्रतिसाद देत आहेत. तसेच अनेक समाज बांधव संस्थेला अभिनंदनाचे, संदेश वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत. अत्यंत कमी कालावधीत संस्थेने केलेल्या प्रगती बद्दल समाजातील सर्व थरातून समाधान व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत . भविष्यात ही संस्था अनेक व्यावसायिक घडवेल असा विश्वास संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री .अशोकदादा वालम आणि अध्यक्ष श्री . प्रेमनाथ ठोंबरे यांनी सांगितले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here