प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे लायन्स क्लब ऑफ नाशिकस्मार्ट सिटिझन अवॉर्डने सन्मानित

61

प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे लायन्स क्लब ऑफ नाशिकस्मार्ट सिटिझन अवॉर्डने सन्मानित

मीडियावार्ता

इगतपुरी प्रतिनिधी

नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या लायन्स क्लब ऑफ नाशिक जिल्ह्याच्या पदभार संमेलनात वाडीवऱ्हे गावचे भूमिपुत्र तथा प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे यांना देशसेवेसोबत सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक स्मार्ट सिटिझन अवॉर्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्यांच्या पुरस्काराबाबत सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बालपणापासून काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेले विजय कातोरे यांनी भारतीय सैन्यात अनेक कोर्स केले. २०१५ साली त्यांनी गरीब मुलांच्या समस्या लक्षात घेत विनामूल्य प्रशिक्षण देणे सुरु केले. 

आतापर्यंत १८ मुलांना त्यांनी कुठलाही मोबदला न घेता भारतीय सैन्यात दाखल केले. त्यांनी तब्बल सतरा वर्ष जम्मु काश्मीर, सिक्कीम, श्रीनगर,पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी आपली सैन्य सेवा केली आहे. आपली सैन्य सेवा संपवून ते थांबले नाही तर त्यांनी समाजसेवेच काम हाती घेतले, भारतीय सैन्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्यासाठी ते काम करतात. इगतपुरी तालुक्यातील आजी माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या समस्यामध्ये खंबीर पणे उभे राहिले आहेत. त्यांनी सैन्य भरतीचे मार्गदर्शन बरोबरच, फायर सेफ्टी चे प्रशिक्षण देणे, पाण्यात बुडलेल्या लोकांना वाचविण्याचे काम ते शासनाला मदत म्हणुन करतात. 

द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन क्लब ही जगातील २१० देशांमध्ये गरिबांसाठी काम करणारी जागतीक पातळीवरील संघटना आहे, जगातील तब्बल १४ लाख सभासद ह्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात, गरीब मुलांचे शिक्षण असो की अंध अपंग लोकांची सेवा समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारी ही संघटना नाशिक मध्ये सुध्दा खुप मोठ्या प्रमाणात काम करत असते. लायन्स क्लब ऑफ नाशिक हे प्रतेक वर्षी नाशिक मध्ये जनतेच्या हितासाठी करतं असलेल्या समाजकार्यासाठी “नाशिक स्मार्ट सिटिझन अवॉर्ड” हे प्रदान करत असते माजी सैनिक विजय कातोरे यांच्या कार्याची दखल लायन्स क्लब ऑफ नाशिकने घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.