मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-ब्राह्मणगाव येथे स्वराज फाउंडेशन मार्फत वह्या वाटप

सौरभ कामडी 

मोखाडा प्रतिनिधी

आज दि. १२/०९/२०२३ रोजी मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम भागामधील ग्रामपंचायत आसे येथील ब्राह्मणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-ब्राह्मणगाव येथील शाळेतील विध्यार्थिना दिंगता स्वराज फाउंडेशन यांच्या मार्फत शाळेतील विध्यार्थिना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. सदर कार्यक्रमास प्रतिष्ठीत गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व पालक उपस्थित होते उपस्थित पैकी ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास गोविंद मौळे यांच्या हास्ते प्रत्येक विध्यार्थ्यांना वाह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी शाळेतील विध्यार्थिना सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. तसेच स्वराज फाउंडेशन मोखाडा यांनी केलेल्या मदतीसाठी शिक्षकवृंद, गावकरी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने खूप खूप आभार व्यक्त केले आहे.

            राज्यातील ६ ते १४ वयोगटातील विध्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान योजने मार्फत दर वर्षी मोफत शैक्षणिक साहित्य म्हणजेच गणवेश व पुस्तके दिली जातात. परंतु लेखन साहित्य हे दिले जात नसून ते विध्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून घ्यावे लागते.

        जव्हार, मोखाडा आदिवासी डोंगराळ ग्रामीण भागात बेरोजगारी जास्त असल्यामुळे बहुतांश पालकांची परिस्थिती ही सामान्य असल्याने ते आपल्या पाल्याना लेखन साहित्य विकत घेऊन देऊ शकत नाही. दुर्देवाने ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहतून मागे ओढली जातात ही बाब स्वराज फाउंडेशनच्या लक्षात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायत आसे मधील ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-ब्राह्मणगाव येथे स्वराज फाउंडेशनच्या मार्फत वह्या वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-ब्राह्मणगाव भेट देऊन वह्या वाटप करण्यात आले तेव्हा सर्व विध्यार्थ्यांच्या मनातील उत्साह हा चेहरायावर दिसून आला ह्या मुळे नक्कीच ग्रामीण भागातील मुले ही शिक्षणाच्या प्रवाहत पुढे येतील व तग धरून राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here