उमरखेड येथे शांतता समितीची बैठक: सण उत्सव एकोपा व शांततेत साजरे करावेत – डॉ. पंकज आशिया

सिध्दार्थ दिवेकर

उमरखेड प्रतिनिधी

मो.9823995466

उमरखेड (दि.14 सप्टेंबर) आगामी काळातील पारंपरिक सण, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण, उत्सव सर्वांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत..! असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

पोलिस प्रशासनामार्फत उमरखेड येथील नगरपरिषद सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात झाली.

 यावेळी आ.नामदेव ससाणे, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार डॉ.आनंद देऊळगांवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे आपले पारंपरिक उत्सव आहे. हे उत्सव साजरे करतांना सलोखा बाळगणे फार महत्त्वपूर्ण आहे. या उत्सवादरम्यान अनूचित प्रकार घडू नये. आपसात तेढ निर्माण होणार नाही.

 याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हे सर्व सण एकोप्याने साजरे करावे. रस्त्यावरील खड्डयांचे काम सणांच्या अगोदर पूर्ण करा.

अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी बांधकाम विभाग व नगरपरिषदेला केल्या. 

बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्तक राहावे.

 वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज मंडळाने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध धर्माचे पदाधिकारी, मंडळ, उत्सव समितीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here