धारशेरी गावातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गाजत वाजत दिला गणपती बाप्पांना निरोप

धारशेरी गावातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गाजत वाजत दिला गणपती बाप्पांना निरोप

धारशेरी गावातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गाजत वाजत दिला गणपती बाप्पांना निरोप

✍️विशाल सुरवाडे✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱मो.9595329191📱

धरणगाव – माध्यमिक विद्यालय धारशेरी तालुका धरणगांव जिल्हा जळगांव येथे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्याध्यापक श्री. मयूर.के.पाटील सर यांच्या हस्ते आणि सर्व शिक्षक वृंद, इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. या वर्षी इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांना या उत्सवाच्या आयोजनाचा मान मिळाला होता.गेल्या सहा दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.सुधाकर पाटील सर यांनी गणेश स्तोत्र पठण घेऊन मुलांना त्याचे महत्व सांगितले.शाळेत संगीतमय ताला सुरात ,नाचत गाजत बाप्पांचे विद्यार्थ्यानी जल्लोषात निरोप दिला.प्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी व विद्यार्थ्यांनी “गणपती बाप्पा मोरया” या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देऊन शाळेजवळील विहिरीत गणपती बाप्पाची मूर्ती चे विसर्जन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here