बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, धक्कादायक माहिती आली समोर

बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, धक्कादायक माहिती आली समोर

बारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, धक्कादायक माहिती आली समोर

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9096817953

नागपुर .नागपुर येथील ऑडी कार अपघात प्रकरणाबाबत सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाहोरी रेस्टॉरंट आणि बार मधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून त्यामध्ये संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे चौघेजण सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत नसल्याची माहिती समोर आली आहे.या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह मध्ये पाहण्याची सोय असून त्याचा रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा चार तरुण तेथे गेले असून सुद्धा ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झाले नाही.

नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. नागपूर पोलिसांनी यावर पत्रकार परिषद घेत अपघातातील गाडी जरी संकेत बावनकुळे यांची असली तरी अपघाताच्या वेळी ते गाडी चालवत नसल्याचे सांगितले होते.याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुढील तपासासाठी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणी सुद्धा करणार आहेत. त्यामुळे जर काही फुटेज त्या डीव्हीआर मधून डिलीट केले गेले असतील तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीमध्ये समोर येतील, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा असो वा सामान्य घरातील त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी फक्त आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल होणार आहेत? पोलीस सध्या त्या दृष्टीने तपास करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here