कोरोना मुळे यंदा शाळेच्या सहलीनाही ब्रेक.

विद्यार्थी नाराज गतवर्षीच्या आठवणींना उजाळा
सामाजिक कार्यकर्ता गजानन पवार पाटील सापळी ..

विनायक सुर्वे प्रतिनिधी 

वाशिम:-  कोरणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यापासून शाळांना कुलूप लागले आहे चिमुकल्याच्या स्वच्छ यावरही निर्बंध आले आहेत शाळा बंद असल्याने यंदा वर्षा सहलींना ही ब्रेक लागला असून या सहलीच्या निमित्ताने चिमुरड्याच्या दरवर्षी निसर्गाची होणारा मुक्त संवाद यावर्षी खंडित झाला आहे चिमुकल्‍याचे निसर्गाचे नाते जोडण्यास मदत करणाऱ्या वर्षा सहलींना कोरोना विषाणूने ब्रेक लावला आहे या सहलीने खरेतर मुलाचे उभारते भावविश्व अधिक बहृण्यास व समृद्ध होण्यास मदत होते आपल्या परिसरातील नैसर्गिक व सामाजिक जीवनशैलीचा परिचय होतो तसेच मुलांच्या जैवविविधतेचा अभ्यास होतो वनभोजनाचा आनंद घेताना मैत्रीचे नाते दृढ होण्यास हातभार लागतो अभ्यासाच्या तणावातून मुक्त होऊन मित्र-मैत्रिणींबरोबर शुभेच्छा जगण्याचा अनुभव घेऊन कलागुणांची जोपासना करता येते दरवर्षी परिसरातील प्रसिद्ध मंदिरे ऐतिहासिक स्थळे जंगल परिसर तलाव धरणे पर्यटन स्थळे आदी ठिकाणांना आवर्जून भेट दिली जाते परंतु यंदा कोरोणामुळे वर्षा सहलीचा आनंदापासून विद्यार्थी मुकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here