अमरावती जिल्हात शेतकऱ्याची आत्महत्या


शेतकरी परतीच्या पाऊसाने तोड़ा जवळ आलेला घास पीक गेल्यामुळे झाला होता हवालदिल.

अमरावती :- आज परतीच्या पाऊसामुळे विदर्भातील शेतकऱ्याच्या तोड़ा जवळ आलेला घास गेल्यामुळे आज विदर्भातील शेतकारी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार ने लवक-यात लवकर शेतक-या करिता काही उपायोजना करण्याची गरज आहे. सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सडल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील युवा शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारी 4 च्या सुमारास उघड झाली. सुरेंद्र ऊर्फ गणेश वसंतराव इंगोले 39 असे मृत शेतकºयाचे नाव आहे.

आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीन सवंगणी करून त्याची शिवारातच गंजी लावली. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास ते शेतात गेले असता, परतीच्या पावसाने त्यातील काही सोयाबीन सडल्याचे दिसून आल्यामुळे ते विचारमग्न स्थितीत तासाभरात घरी पोहोचले व घरातच विषारी द्रव्य प्राशन केले.

कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचेवर सोसायटी व एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज होते. सोयाबीन हातचे गेल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी आत्मघात केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास जमादार विनोद बोबडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here