समृद्धी महामार्गाच्या कामा मुळे शेतकरी अडचणीत

              
 प्रतिनिधी
वर्धा :-  नागपूर-मुंबई जलत गती महामार्गाचे काम माघील अनेक दिवसा पासुन सुरु आहे. पण आता हे काम शेतक-यांना त्रास दायेक आहे अस दिसून येत आहे.
नागपूर-मुंबई जलत गती महामार्गाचे काम अॅफकॉन्स कपंनीच्या माध्यमातून केले जात असून कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यातील 579. 464 हेक्टरमधून समृद्धी महामार्ग जात असून याकरिता जमिनी संपदित केल्या आहेत. या महामार्गाचा कंत्राट असलेल्या अफकॉन्स कंपनीने सुरुवातीपासून अवैध उत्खननासह अवैध वाहतूक सुरू केल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अफकॉन्स कंपनीविरुद्ध अवैध उत्खननप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तरीही कंपनीच्या कामकाजात सुधारणा झालेली नसल्याने महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आर्वी तालुक्यातील सोरटा-विरूळ भागात महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यावरुन दिवसरात्र जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची वाट लागली असून उडणाऱ्या धुळीने पिकांचेही नुकसान होत असल्याने विरूळ, सोरटा, रसुलाबाद, पिंपळगाव, निजामपूर, टाकळी, मारडा, सालफळ तर वर्धा तालुक्यातील पिपरी, गणेशपूर, पांढरकवडा या गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच निसर्गकोपाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अॅफकॉन्सच्या कामाने आणखीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अॅफकॉन्सच्या मनमर्जी कामाला ब्रेक लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here