हिंगणघाट रस्तावर मोकाट जनावरांचा ठिय्या, नगर पालिका कोमात.

54

हिंगणघाट रस्तावर मोकाट जनावरांचा ठिय्या, नगर पालिका कोमात.


मुकेश चौधरी प्रतिनिधी
हिंगणघाट:-  शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अमृत योजनेच्या माध्यमातुन भुमीगत पाईप लाईन चे काम सुरु असल्यामुळे, शहरात रस्ते कमी आणी खड्डे जास्त दिसत आहे. आणी आता रस्त्यावर मोकाट पाळीव जनावरांचा भटकंती मुळे शहरातील लोकांना जीव मुठीत घेऊन चालाव लागत आहे.

हिंगणघाट शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, हिंगणघाट नगर पालिका प्रशासना तर्फे अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उनाड जनावरे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

हिंगणघाट सौंदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आधीच अडथळे निर्माण झाले आहेत. या अडथळ्याची शर्यत पार करत वाहनचालक कसेतरी मार्गक्रमण करत आहेत. मात्र, महामार्गावर मधोमध बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे हा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.

प्रवासादरम्यान शहरातील मुख्य महामार्ग या जनावरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समोरील रस्ताचे काम एका बाजूचे सुरु असल्यामुळे. त्यामुळे या परिसरात चालकांना अडचण भासत आहे.

जनावरांमुळे काहींना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत. उनाड जनावरांचा योग्य तो बंदोबस्त केला नाही तर हिंगणघाट शहरात अपघाताचा धोका वाढणार आहे.