नागपुर जागतिक दर्जाचा दीक्षाभूमीचा विकास कुठे अडकला.

प्रतिनिधी
नागपूर :-  सरकार कुठलीही असो आपली होट बैंक वाढवीण्यासाठी मोठ मोठ्या योजने चे गाजर देऊन समाजाला खुश केले जाते. पण कागदावर चांगली वाटणारी योजना ही किती फसवी असते हे दीक्षाभूमीचा विकास कामावरुण दिसुन येते.
भाजप सरकारने मोठा गाजावाजा करीत दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा केली होती. तब्बल 350 कोटी रुपये यावर खर्च होणार होते. त्यापैकी 40 कोटीची घोषणाही केली होती, परंतु यादृष्टीने काहीही झालेले नाही. उलट निधीअभावी स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणाचे कामही रखडले आहे.
भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा केली होती. एक-दोन वेळा नाही तर अनेकदा त्यांनी ही घोषणा केली. दीक्षााभूमीवरूनच त्यांनी साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाच्या विकासाचे आश्वासन दिले होते. यापैकी 40 कोटी रुपये देण्याची घोषणाही केली होती. पुढे त्याचे काय झाले कुणालाच माहीत नाही. स्मारक समितीलाही या योजनेचे पुढे काय झाले याची माहिती नाही. यातच केंद्राच्या दिल्ली येथील आंबेडकर फाऊंडेशनतर्फे स्मारकाच्या डोमच्या नुतनीकरणासाठी 10 काेटी रुपये मंजूर झाले होते. यापैकी 4 कोटी रुपयाचा निधीही मिळाला. डोमच्या कामालाही सुरुवात झाली. परंतु उर्वरित निधीअभावी हे काम रखडले आहे.

स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणा साठी 10 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ 4 कोटी रुपये मिळाले. उर्वरित निधी तातडीने मिळावा. यासोबतच दीक्षाभूमीला लागून असलेली कृषी विभागाची जागा सरकारने द्यावी, अशी स्मारक समितीची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here