खड्डे न बुजवता झाला गाजावाजा.


मालेगाव कारंजा नॅशनल हायवेवर खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे
  विनायक सुर्वे  प्रतिनिधी
वाशिम:-  मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग मालेगाव ते कारंजा नॅशनल हायवेवर महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असून खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. बऱ्याच वेळा असे निदर्शनास आले वाहन चालक खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एक्सीडेंट सुद्धा झाले .
या संबंधित बऱ्याच पक्षाने पाठपुरावा केले व संबंधित विभागाला निवेदन सुद्धा देण्यात आले. त्याच्यानंतर संबंधित विभागाने याची दखल घेत रोडवरील खड्डे बुजवण्यात आले अशा दिलासा देणाऱ्या बातम्या दैनिक पेपर मधून प्रकाशित करण्यात आल्या पण वास्तविक निराळाच मालेगाव ते कारंजा नॅशनल हायवे वरील खड्डे ची परिस्थिती जैसे थे तसेच आहे त्याच्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची दिशाभूल तर होत नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
या संबंधित जबाबदार व्यक्ती दखल घेऊन येथील स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना होत असलेला त्रास थांबवावा हीच जनतेतून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here