माजी राज्यमंत्र्यांच्या एका म्हणण्यावर वडेट्टीवारांनी दिले पंचनाम्याचे आदेश.


प्रतिनिधी विनायक सुर्वे

वाशिम:-  सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात  लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.

जिल्ह्यात 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील विदारक परिस्थिती मांडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
सोयाबीन हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. परंतु 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सोंगुण टाकलेली सोयाबीन, शेतात  लावलेल्या सुड्याच्या गंज्या व शेतातील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  याबाबत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी जिल्ह्यातील विदारक स्थितीची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे मांडून नुकसान ग्रस्त शेतातील पिकांचे सर्वेक्षण तथा पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  दखल घेत तातडीने  पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.यामुळे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here