तरुण बांधवानो स्वैच्छिक रक्तदान करण्यासाठी पुढे या,गोरगरीब रुग्णाला सहकार्य करा.


शिवा सावके यांनी केले सर्व तरुणांना आव्हान

विनायक सुर्वे प्रतिनिधी 

वाशिम:- सद्या आपल्या देशासह संपूर्ण जगात भयावह स्थिती निर्माण झाली आहे,आणि या कठीण काळात रुग्णांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यात सर्वात महत्वाचा विषय मनजे रक्त,

आज शासकीय रुग्णालयात अनेक नातेवाईक रक्त मिळावे मनुन रक्तदाते मित्रांची शोधाशोध करत आहेत, रक्त अशा परिस्थिती मध्ये काही दुर्गम भागातील रुग्णाला रक्तदाते शोधताना खूप समस्यांना समोर जावे लागत आहे आणि बहुतांश ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे सर्व युवा मित्रांनी स्वतःवरून समोर येऊन रक्तदान करून गोरगरीब रुग्णाला सहकार्य करावे.

रक्तदान हे शरीरासाठी अतिशय चांगले आहे, थॅलेसेमिया च्या लहान मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते त्यांना सुद्धा रक्त मिळण्यासाठी सद्या भरपूर त्रास होत आहे, रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत, सोबतच तुमच्या एका रक्तदानामुळे तीन रुग्णाला सहकार्य होऊ शकते, भरपूर रक्तगट चे ब्लड 0 स्टॉक वर आहे त्यामुळे सद्याच्या या स्थितीत तुम्ही रक्तदान करून एक महत्वाची भूमिका निभावू शकता, तुमच्या जवळच्या शासकीय रक्तपेढी मध्ये जाऊन स्वैच्छिक रक्तदान करा व रुग्णास सहकार्य करा, सोबतच ग्रामीण भागातील युवा मित्रांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून सहकार्य करावे कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तर रुग्णसेवा युवा ग्रुपशी संपर्क करा असे आव्हाहन रुग्णसेवा युवा ग्रुपचे अद्यक्ष शिवा सावके, सुरेंद्र पाटील राऊत, शुभम डोफेकर, संतोष लांभाडे, राहुल रोकडे, राम सुर्वे, दिनेश फुके, विनायक सुर्वे, गोपाल घुगे, उमेश सुर्वे,मनोज सावके, आशिष बारड, सुबोध वंजारे, अंकुश ठाकरे, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here