कळमेश्वर येथील एमआयडीसी चौक येथे नवरात्री निमित्य अन्नदान.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर:- कळमेश्वर येथे नवरात्र मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्ताने जागोजागी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
कळमेश्वर येथील एमआयडीसी चौक येथे नवरात्र दुर्गा अष्टमीच्या निमित्ताने भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन गुलाब कुंबरे हे उपस्थितीत होते. तर ग्रामपंचायत सेलूचे उपसरपंच प्रदीप भाऊ चंनकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजनदानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात रोशन गजभिये, मिथुन पटेल, राकेश गजभिये, गोलू भोयर, राजू डाखोडे, अमोल भुरे, सुभाष नरोलिया, हंसराज बात्रा व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.