बनावट पास व देणगी पावती प्रकरणी कठोर कारवाई करा; सुरेश आरणे
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
शिर्डी : – साईबाबा संस्थान दर्शन पास विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाने पास विकला अशी चर्चा सुरू आहे ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती परंतु गुन्हा दाखल होत नाही त्याबरोबरच बनावट देणगी पावती प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास अटक करण्यात यावी त्याला ज्यांनी मदत केली त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा हार फुले चालू करावी या मागणीसाठी माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी साई मंदिर गेट नंबर ४वल उपोषण सुरू केले जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण सोडले जाणार नाही असे आरणे यांनी सांगितले यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश पगारे शहर अध्यक्ष सचिन चौगुले पत्रकार जितेश लोकचंदाणी सिमोन जगताप विक्रांत वाकचौरे अविनाश शेजवळ दिगंबर कोते समीर शेख सुयोग सावकारे आदी उपस्थित होते या उपोषणाला माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर नगराध्यक्ष कैलास बापू कोते मा नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण माजी नगराध्यक्ष विजय जगताप सुनिल परदेशी पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील गोपनीय विभागाचे अविनाश मकासरे आदीसह अनेकांनी भेटी दिल्या असुन अनेकांनी समक्ष भेटून पाठींबा दिला आहे बनावट देणगी पास प्रकरण आरती पास विक्री प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल केला जावा दोन्ही प्रकरणी जलदगतीने तपास केला जावा हार फुले साईबाबा मंदिरात सुरू करा या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सोडले जाणार नाही असा इशारा आरणे यांनी दिला आहे.