शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

46
शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

शिर्डी : – विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी वीस शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या रेखाकला परीक्षेमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट असे दोन भाग पडतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अ, ब, क असे गुणांकन केले जाते आणि त्याचे रूपांतर बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क्स मध्ये होते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कलेची माहिती मिळते, एकाग्रपणा वाढतो. विद्यार्थ्यांना सर्वच बाजूने या परीक्षेचा उपयोग होतो.
एलिमेंट्री परीक्षेसाठी 1100 तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 604 असे एकूण 1704 विद्यार्थी बसले होते, अशी माहिती केंद्र संचालक प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर आणि उपकेंद्र संचालक श्री.चंद्रकांत जोशी यांनी दिली. चित्रकला विभागातील श्री.महेश चोणगे, श्री.विक्रम शिंदे, श्री.योगेश कोठावदे यांनी परीक्षेचे नियोजन केले तर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री.अनिल खामकर, श्री.हरिभाऊ कुलकर्णी आणि श्री.विठ्ठल खेडकर, श्री. सचिन थोरात (लिपिक), श्री.निलेश ढाकोळ (लिपिक), श्री.मुकुंद जगताप (सेवक), श्री.सचिन गवळी (सेवक) यांनी मदत केली.
मोठ्या प्रमाणावर परीक्षेचे नियोजन केल्यामुळे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.सौ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.श्री. सतीश गवळी, सकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य आणि बी.सी.एस वरिष्ठ महाविद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष ॲड.श्री.संदीप आगरवाल, उपमुख्याध्यापिका सौ.सुनीता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर पर्यवेक्षिका सौ. क्षमा देशपांडे यांनी कौतुक केले आणि परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.