67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे दीक्षाभूमीवर आयोजन
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 14 ऑक्टोबर
दरवर्षीची उज्वल परपंरा कायम ठेवीत चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 15 व 16 ऑक्टोबर रोजी 67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात विविध क्षेत्रातील अभ्यासक सहभागी होत आहेत.
15 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता विश्वशांती, बंधूत्व प्रेरित वाहनासह भव्य मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता आयोजित धम्म ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4.40 वाजता धम्मज्योत प्रज्वलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त धम्ममेत्ता घोष (चंद्रपूर) राहतील. तर, विशेष अतिथी म्हणून भदन्त ज्ञानज्योती महारथवीर (चिमूर), भदन्त सारिपुत्त ((म्यानमार, ब्रम्हदेश), तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4.50 वाजता सामुहिक बुद्धवंदना, रफुर्तीगाण, अतिथीचे स्वागत आणि धम्म प्रवचन, तर, रात्री 8 वाजता ‘जागर समतेचा’ बुद्ध भिम गीतांचा कार्यक्रम होईल.
16 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता शहराच्या मध्यभागी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूकलशासह वंदनीय भिक्षुगण समता सैनिक दलाचे पथसंचलनासह आकर्षक मिरवणूक पवित्र दिक्षाभूमिकडे प्रस्थान करेल. सकाळी 11 वाजता ‘बुध्दधम्म आणि आधुनिक विज्ञान’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते प्रा. रवी कावळ, भदन्त नागसेन (भंडारा), भिक्खुनी खेमा (बल्लारपूर), डॉ गोवर्धन दुबे (वर्धा) उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता सामुहिक बुद्धवंदना आणि धम्मप्रवचन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई राहतील. यावेळी भदन्त नागसेन, भदन्त धम्मबोधी, भदन्त धम्मविजय, भदन्त कश्यप, भदन्त महानामा, भदन्त धम्मविकास उपस्थित राहतील.
सायंकाळी 5 वाजता आयोजित मुख्य समारंभाच्या अरुण घोटेकर राहतील. तर, प्रमुख अतिथी म्हणून भदन्त डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), भदन्त सारिपुत्त (म्यानमार, ब्रम्हदेश), विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. अॅड. अभिजीत वंजारी, उत्तरप्रदेश पर्यटन विभागाचे सचिव मुकेश मेश्राम, आ. सुधाकर अडबाले, आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, डॉ. आंबेडकर चरीत्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांची उपस्थित राहणार आहे. रात्री 9 वाजता नागपूर येथील आकांक्षा नगरकर आणि संच बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम सादर करतील. या समारंभातील विविधांगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अरूण घोटेकर, वामन मोडक यांनी केले आहे.