माणगाव एस् . एस् . निकम स्कूलच्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची ” झेप विज्ञानाकडे”

49
माणगाव एस् . एस् . निकम स्कूलच्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची " झेप विज्ञानाकडे"

माणगाव एस् . एस् . निकम स्कूलच्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची ” झेप विज्ञानाकडे”

माणगाव एस् . एस् . निकम स्कूलच्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची " झेप विज्ञानाकडे"

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 89832 48048📞

माणगांव :- दि.१३/१०/२०२३ शुक्रवार या दिवशी माणगाव मध्ये प्रथमच एस्. एस् . निकम इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक विभाग येथे ४ ते ६ वयोगटातील मुलांसाठी “रोबोटिक्स ” च्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन केले होते . दक्षिण रायगड मध्ये ही पहिलीच अशी शाळा ठरली की जिथे प्रथमच “रोबोटिक्स ” ची सुरुवात झाली .यावेळी कार्यक्रमासाठी “रोटरी क्लब माणगांव ” चे अध्यक्ष बिपीन दोशी व कल्याणी दोशी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते . शाळेचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, शाळेचे चेअरमन डॉ. केतन निकम, सुलभा निकम , शाळेच्या मुख्याध्यापिका रुख्सार टाके आणि पालकवर्ग उपस्थित होते . रोबोटिक्सचे उद्‌घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्ज्वलनाने झाले. सिनियर केजी या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या रोबोटिक साहित्याच्या साह्याने विविध प्रकारच्या वस्तू बनविल्या होत्या .
वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपला देश प्रगतीपथावर आहे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदी व उत्साहाने आपल्या कृतीतून सादरीकरण केले . या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी पालकांनी ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .