लखीमपुर खेरी शहीद किसान -पत्रकार अस्थिकलश यात्रेचे ब्रम्हपुरी तालुक्यात उत्स्फुर्त स्वागत

64

*लखीमपुर खेरी शहीद किसान -पत्रकार अस्थिकलश यात्रेचे ब्रम्हपुरी तालुक्यात उत्स्फुर्त स्वागत

लखीमपुर खेरी शहीद किसान -पत्रकार अस्थिकलश यात्रेचे ब्रम्हपुरी तालुक्यात उत्स्फुर्त स्वागत
लखीमपुर खेरी शहीद किसान -पत्रकार अस्थिकलश यात्रेचे ब्रम्हपुरी तालुक्यात उत्स्फुर्त स्वागत

राहुल भोयर,ब्रम्हपुरी शहर प्रतिनिधी

ब्रम्हपुरी–संयुक्त किसान मोचाॆचे आवाहनावरुन अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती,कामगार संघटना कृती समिती,जनआंदोलनाची संघर्ष समीती यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य किसान सभा (भाकप) द्वारा आयोजित “लखीमपुर शहीद किसान -पत्रकार अस्थीकलश यात्रा”महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड अशोक सोणारकर,सहसचिव कॉ.अरुण वणकर ,राष्ट्रीय कौन्सिल सदक्ष कॉ .महेश कोपुलवार , कॉ.लक्ष्मण धाक डे, कॉ.गंगाधर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली 7नोव्हें.पासुन अमरावती,वर्धा,यवतमाळ,वणी,भद्रावती ,चंद्रपूर ते गडचिरोली मार्गे 12 व 13 नोव्हेंबर रोजी ब्रम्हपुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक व तालुक्यातील बरडकीनी, चीचगाव,पिंपळगाव (भो.), गांग लवाडी, आवळ गाव, हळदा, बोडधा, व मुडझा या गावात आली.या ठिकाणी स्थानिक शेतकरी, कामगार,व नागरीकांनी या अस्थीकलश अभिवादन यात्रेत सहभागी होऊन स्वागत करून अभिवादन केले व श्रद्धांजली समर्पित केली.नंतर या ठिकाणी जाहीर सभा झाल्या.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अशोक सोनार्कर, कॉ.अरुण वनकर ,कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य तथा ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कॉ.विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शहीद शेतकरी ,पत्रकार अस्थिकलश यात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वासू सोंदरकर,जगदीश पीलारे,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भानारे ,चिमूर विधान सभा प्रमुख अमृत नखाते,तालुका अध्यक्ष नरू नरड ,पराग माटे,अमोल माकोडे,प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अधक्ष अँड हेमंत ऊरकुडे,राहुल पांडव,किसान सभा तालुका अधक्ष विनोद राऊत ,सुहास हजारे ,विलास प्रधान,सुधीर खेवले,बाबुराव तोंड रे,नानाजी ढोरे,पिंपळगाव चे सरपंच दूनेदार, सोंद्री चे सरपंच पारधी, आवळगाव चे ग्राम पंचायत सदक्ष अश्र्वजित जनबंधू , तुकाराम राऊत,रामदास भोयर,सेवा सहकारी सोसायटी चे अधक्ष विठ ल किन्हेकर,हळदा चे माजी उपसरपंच संजय लोणारे,ग्राम पंचायत सदक्ष नानेशवर झरकर, बोडधा चे माजी सरपंच शरद ठाकरे, विठल
ठाकरे, मुडझा येथील सामाजिक कार्यकर्ते हरिदास चुधरी ,राजू राऊत,यांच्या सह विविध संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
दि.14/11/2021