नोकरीचा आमिष दाखवून एका इसमाला लुबाडले माणगांव पोलिसांनी केला टोळीचा पर्दापास

नोकरीचा आमिष दाखवून एका इसमाला लुबाडले माणगांव पोलिसांनी केला टोळीचा पर्दापास

नोकरीचा आमिष दाखवून एका इसमाला लुबाडले माणगांव पोलिसांनी केला टोळीचा पर्दापास

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092310📞

माणगांव:-सिडको मध्ये नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीला माणगांव पोलीस स्टेशनं कडून अटक करण्यात आली माणगांव येथील भावेश सुनील मोरे वय वर्ष २६ रा. पुष्पराज बिल्डिंग आईस फॅक्टरी समोर निजामपूर रोड माणगांव या इसमास दि.२ ऑगस्ट रोजी पासून माणगांवयेथील राहणारे संकेत मुंढे, अनिकेत तांडेल, विनायक धोत्रे यांनी फिर्यादी इसम भावेश मोरे याला तुला सिडको मध्ये नोकरी लावतो असे सांगून त्यास खोटे बनावट जॉइनिंग लेटर तयार करून भावेश यास देऊन व पुन्हा कामाची नवीन फाईल तयार करावी लागेल त्यासाठी चालीस हजार रुपये द्यावे लागतील तसेच फाईलवर सह्या करण्यासाठी सत्तावन्न हजार व बॉण्ड पेपर करण्यासाठी दहा हजार रुपये अशी एकूण रक्कम १.८३,५५० अशी द्यावी लागेल अशा पद्धतीने फिर्यादी भावेश मोरे यांनी सिडको ला काम मिळावं याकरिता दिली होती. पण भावेश मोरे या इसमाची फसवणूक केली होती म्हणून भावेश मोरे याने माणगांव पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये संकेत अशोक मुंढे वय वर्ष २३ रा. वाकडाई नगर माणगांव सध्या रा.धाटला व्हिलेज कर्नाटक हायस्कूल च्या जवळ चेंबूर मुंबई, अनिकेत बाळाराम तांडेल वय वर्ष २५ रा.ओम शिवा कॉम्प्लेक्स युगातक कॉलनी सुकापूर नवीन पनवेल रायगड, व सौरभ सदू भोनकर वय वर्ष २५ रा. विकास कॉलनी समता नगर माणगांव रायगड यांनी व इतर साक्षीदार यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याचे निष्पण झाले असून सदर आरोपीस नवी मुबंई येथून अटक करण्यात आले आहे. सदर ची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सो.अप्पर पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे, सौ.उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी याच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनि सतीश आस्वर पो शि अमोल पोधे, पोशि नाथा दहिफळे, पो शि रामनाथ डोईपोडे, पो शि श्याम शिंदे माणगांव पो स्टे पो ना अक्षय पाटील तुषार घरत सायबर सेल यांनी या टोळीला अटक करून त्याच्याकडून ७५ हजार रुपये हस्तगत केले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास माणगांव पोलीस स्टेशनचे सपोनि सतीश आस्वर हे करीत असून शासकीय खात्यात अथवा इतर ठिकाणी नोकरी लावतो असे सांगून कोणी पैसे मागत असल्यास विध्यार्थी अथवा बेरोजगार तरुणांनी किंवा पालकांनी अशा प्रकारास बळी पडू नये असे माणगांव पोलिसांनी आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here