श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यात प्रथमच स्पर्धा परीक्षेचे आयोजन.

56

नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता. प्रतिनिधी
8983248048

श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांच्या माध्यमातून प्रथमच म्हसळा तालुक्यात ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, विद्यार्थांना ही खुप मोलाची संधी रविप्रभा मित्र संस्था उपलब्ध करून देत आहे. कारण भविष्यात जर का काही विद्यार्थ्यांना UPSC/MPSC ची तयारी करायची असल्यास अशाप्रकारे परीक्षा देणे आवश्यक आहे, कारण यातून आपणास यश संपादन करण्यासाठी मार्ग सापडतो. मग विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना सांगण्यात येत आहे की आपल्या पाल्याला अशाप्रकारे होणाऱ्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करा आणि या संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षेला नक्की बसावा. प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ बक्षीस आकर्षक ट्रॉफी व प्रशिस्तपत्रक तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व काही विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी….. लागा तयारीला… विजयी भव…
परीक्षेचे ठिकाण न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा , परीक्षेची वेळ ७ जानेवारी २०२४ रोजी स.११ ते दु १२.३० वां पर्यंत असेल.
नाव नोंदणी करण्यासाठी सम्पर्क –
१)रविंद्र लाड(अध्यक्ष)
९२७३५५२१०७ २)सुशांत लाड
(खजिनदार)
९२७२५९३५५५
३)संतोष उद्धरकर(सल्लागार)
७८७५८७१७७१
४)चंद्रकांत बैसाने सर
८९८३२३८२६४
५)दिपक पाटील सर
९४२१५४१४५८