नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार ‘मतदार चिठ्ठी’

नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार ‘मतदार चिठ्ठी’

नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार ‘मतदार चिठ्ठी’

📢18001237980 या टोल फ्री क्रमांकावर करता येणार संपर्क

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 14 नोव्हेंबर
भारत निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुक कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राकरीता दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होवुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत विविध उपक्रम सातत्याने घेतले जात आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.या मतदार चिठ्ठीद्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये,नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर ( Epic Number ) टाकून माहिती करून घेता येणे शक्य आहे.
त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जावून माहिती करून घेता येईल किंवा चंद्रपूर महानगरपालिकेच्या 18001237980 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मतदार चिठ्ठीबाबत माहिती घेता येईल. तेव्हा सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here