Home latest News भिवंडी लोकसभा खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या खासदार निधीतून भिवंडीत कोट्यावधी...
भिवंडी लोकसभा खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या खासदार निधीतून भिवंडीत कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या खासदार निधीतून भिवंडीतील सुमारे साडे तीन कोटी रुपयांच्या विविध २३ विकास कामांचे उद्घाटन मंगळवारी खासदार.सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ताडाळी कामतघर येथील ब्रह्मानंद नगर येथे गटर व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४० लाख रुपये निधी खासदार बाळ्यामामा यांनी दिला असून या कामाचे भूमिपूजन खा. सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या प्रसंगी माजी नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी, यशवंत चौधरी यांच्यासह ब्रह्मानंद नगर मधील कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते. या नंतर शहरातील नवी वस्ती, रावजीनागर, आस बीबी चौक, एसटी स्टॅण्ड येथील शिया कब्रिस्थान दुरुस्ती, गुलजार नगर, पिराणी पाडा, जब्बार कंपाउंड, किडवाई नगर, गायत्री नगर, न्यु आझाद नगर भागातील गटर, पाथवेज, मशिदीसाठी पत्राशेड, पेव्हर ब्लॉक, काँक्रीट रस्ता व गटर बांधकाम अशा सुमारे २३ विकास कामांसाठी खा. सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी सुमारे साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या विकास कामांचे उदघाटन खा. सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. तसेच भिवंडीतील विकास कामांसाठी
आपण सदैव तत्पर असून रखडलेल्या विकास कामांसाठी भिवंडी म.न.पा मुख्यालयात आयुक्त व कंत्राटदारांची संयुक्तीक विशेष बैठक बोलावून शहरात रखडलेली विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावणाचा प्रयत्न करणार असून शहराला आणखी जास्त विकास निधी कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून भिवंडी रोड रेल्वे स्टेशनपरिसरातील नादुरुस्त रस्त्याची ही दुरुस्थी करण्यासाठी तत्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून त्या रस्त्याची दुरुस्थी लवकरात लवकर करणार अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.