Home latest News रईस हायस्कूल भिवंडी मधील विद्यार्थ्यांची भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास शैक्षणिक भेट*
*रईस हायस्कूल भिवंडी मधील विद्यार्थ्यांची भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास शैक्षणिक भेट*
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी दिनांक 13/11/2025 रोजी रईस हायस्कूल भिवंडी येथील शालेय विद्यार्थ्यानी भिवंडी मनपा मुख्यालास शैक्षणिक भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यानी महानगर पालिकेच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाजा संबंधी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी मुख्यालयातील प्राथमिक शिक्षण विभाग, वैद्यकीय आरोग्य, उद्यान, बांधकाम, पाणीपुरवठा इत्यादी विभागांच्या अधिका-यांशी संवाद साधला व कामकाजाचे स्वरूप जाणून घेतले.
प्रशासन अधिकारी शिक्षण) श्री. सौदागर शिखरे यांनी महानगर पालिकेच्या शाळांविषयी माहिती दिली. आणि महानगर पालिकेतील विविध विभागांबाबत थोडक्यात माहिती दिली. त्या नंतर विद्याथ्यांना प्रत्यक्ष विविध विभागांमार्फत कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी सर्व विभागांना भेट देण्यात आली.
त्या मधे वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य वेद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी महानगरपालिकेच्या आरोग्यकेंद्र व त्या मार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा याबहल मार्गदर्शन केले. एका विद्याथ्यांने प्रश्न विचारला की ज्या प्रमाणे भिवंडी शहर पोलिओ मुक्त झाले आहे तसेच TB मुक्त कधी होईल. यावर डॉ. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना TB होण्याची कारणे व घ्यावयाची खबरदारी तसेच त्यावरील औषधोपचार यावाचत मार्गदर्शन केले. तसेच महानगरपालिकेने सुरू केलेल्या आपला दवाखाना या उपक्रमाबाबत माहिती दिली.
उद्यान विभागामध्ये उद्यान अधोक्षक यांनी मुलांचे स्वागत केले आणि पर्यावरण संतुलनासाठी झाडांचे महत्व समजावून सांगितले तसेच भिवंडी शहरातील उद्याने तसेच मीयावाकी वने या बाबत Slide Show द्वारे माहिती दिली.
पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संदीप पटनावर यांनी भिवंडी शहराला होणारा पाणी पुरवठा आणि प्रती व्यक्ती पाण्याची गरज या बाबत माहिती दिली. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबात माहिती दिली. पाण्याचे जलचक्र समजावून सांगितले आणि विद्याथ्यांनो भिवंडी शहरातील पाण्याच्या समस्ये बहल विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना पाणी हे आपण निर्माण करू शकत नसल्याने आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने पाण्याचा वापर जपून करण्याचे व अपव्यय टाळण्याचे सांगितले. यावर विद्यार्थ्यानी समुद्राचे पाणी पिण्यायोग्य कसे करता येईल असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी सांगितले की होय समुद्राच्या पाण्याची कृत्रिम रित्या वाफ करून वाफे पासून पिण्या योग्य पाणी करण्याची पद्धत gulf country मधे वापरली जाते परंतु ती खर्चिक असल्याने भारतात त्याचा फारसा वापर केला जात नाही. बांधकाम विभागात उप- अभियंता श्री विनोद मते यांनी विद्यार्थ्याना डांबरी रस्ते आणि RCC रस्ते यातील फरक समजावून सांगितला तसेच भिवंडी शहरातील रस्त्यांना खड्डे का आहेत याचे उत्तर देताना रस्त्यांचा प्रकार, पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता व रस्त्याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या व क्षमता याचे प्रमाण समजावून सांगितले आणि आता भविष्यात जास्त टिकाऊ रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असल्याचे सांगितले.
या नंतर विद्यार्थ्यांनी मा. उपायुक्त (शिक्षण) श्री. बाळकृष्ण क्षीरसागर यांचे दालनास भेट दिली त्या वेळी विद्यार्थ्यांनी त्याच्या शालेय जीवना विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचा संपूर्ण आजवरचा प्रवास व अभ्यासाविषयी माहिती दिली तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणेबाबत मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्या साठी शुभेच्छा दिल्या. मा अतिरिक्त आयुक्त श्रो. विठ्ठल डाके यांचे दालनात विद्याथ्यांनी भेट दिली असता डाके सरानी मुलांना महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी या दोन बाजू असतात प्रशासनाचे प्रमुख मा.आयुक्त साहेब असतात व लोकप्रतिनिधी प्रमुख मा.महापौर असतात हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना महानगरपालिकेचे स्व.विलासरावजी देशमुख सभागृह दाखविण्यात आले व प्रशासनाचे कामकाजाबाबत ध्येय व धोरणे याबाबत सभागृहात चर्चेद्वारे निर्णय घेतले जातात हे मुलांनों जाणून घेतले महानगरपालिकेतील विविध विभागांचे कामकाज जाणून घेतल्या नंतर विद्यार्थ्यांना मा आयुक्त सो यांना भेटण्याची उत्सुकता होती. मा.आयुक्त सो यांचे दालनामध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे मनामध्ये ई Officer कसे बनतात त्या साठी किती मेहनत करावी लागते, अभ्यास कसा करायचा या बाबत अनेक प्रश्न होते त्यांनी मा.आयुक्त सो यांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.मा.आयुक्त श्री. अनमोल सागर यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी आज महानगरपालिकेतील कोण कोणत्या विभागांना भेट दिली आणि कोणती माहिती मिळाली या बद्दल विचारले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना शिस्त आणि मेहनत याचे महत्व समजावून सांगितले तसेच IAS होण्याची पहिली पायरी म्हणजे नियमित वृत्तपत्र वाचन करण्यास सांगितले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केवळ IAS नाही तर सर्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी शिस्त व मेहनत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयं रोजगारासाठी शासनाच्या विविध योजना असतात त्या बाबतीत माहिती करून घेण्यास सांगितले. आपले भिवंडी शहर स्वच्छ ठेवणे, कायदा व सुव्यवस्था पाळणे हे एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. आणि यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेट देऊन निरोप दिला. अशा प्रकारे आज प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रईस हायस्कूल भिवंडी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले.