बीड लग्न सोहळा उरकून गावी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत 4 मित्र जागीच ठार

बीड :- गंगाखेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर परळी रस्त्यावर करम पाटी जवळील जिनिंग समोर झालेल्या हायवा ट्रक व ऑटोच्या अपघातात ऑटोतील चौघे ठार झाल्याची घटना दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे घटनास्थळावरच चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर  ऑटो रिक्षा गाडीखाली अडकली होती. मृतदेह हायवा ट्रक खाली फसल्याने रिक्षाला बाहेर काढण्यासाठी तब्बल 2 तास लागले होते. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने रिक्षाला बाहेर काढावे लागले होते.

सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड परळी रस्त्याने परत परळी मार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटो क्रमांक एमएच 23 टीआर 311 ला परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा क्रमांक एमएच 22 ए एन 5121 ने समोरासमोर जोराची धडक देऊन ऑटो रस्त्याखाली नेल्याने या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले वय 20 वर्ष, दत्ता भागवत सोळंके वय 25 वर्ष, आकाश चौधरी वय 23 वर्ष, ऑटो चालक मुकुंद मस्के वय 22 वर्ष सर्व रा. अंबाजोगाई हे चौघे जण जागीच ठार झाले आहे मित्राचा विवाह सोहळा आटोपून गावी परतणाऱ्या रिक्षाला राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने जोरात धडक दिली. बीड जिल्ह्यातील गंगाखेड-परळी महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर परळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले आणि रिक्षा चालक मुकुंद म्हस्के हे चारही तरुण अंबाजोगाई येथील रायगडनगर इथं राहत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजता कुटुंबावर आणि रायगडनगरवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here