दिल्ली तरुणीचं अपहरण करून तीन जणांचा सामूहिक बलात्कार

54

दिल्ली तरुणीचं अपहरण करून तीन जणांचा सामूहिक बलात्कार

दिल्ली:- तरुणीचं अपहरण करून तीन जणांनी तिच्या सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दिल्लीच्या शकूर बस्ती रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे. 10 डिसेंबर रोजी रात्री पीडित तरुणीचं आपल्या घरच्यांशी भांडण झालं होतं. या भांडणामुळे व्यथित होऊन ती शकूर बस्ती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर येऊन बसली. रात्री 12च्या सुमाराला तीन तरुण प्लॅटफॉर्मवर आले आणि त्यांनी तिची छेड काढायला सुरुवात केली.

तिने विरोध केला तेव्हा तिला त्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तिचं अपहरण केलं. रेल्वे स्टेशन शेजारील झुडुपांमध्ये तिला घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर आरोपी फरार झाले. घाबरलेली तरुणी घरी पोहोचली आणि तिने दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या तिच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्रलंबित आहे.

पीडितेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे बनवली आहेत. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.