अमरावती मोबाईल चॅट डिलीट करून अभियांत्रिकीचा विद्यार्थ्यानं केली आत्महत्या.

अमरावती:- गाडगेनगरहद्दीत राहणाऱ्या व अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या युवकाने मोबाईलवर केलेले चॅट डिलीट करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी वरोरा येथील युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

आत्महत्या करणारा अमरावतीचा युवक बाहेर राज्यातील एका आयआयटी कॉलेजमध्ये बीई अंतिम वर्षाला शिकत होता. लॉकडाउनमुळे तो अमरावतीमध्ये घरीच होता. त्याची एका मुलीसोबत फ्रेण्डशीप सुरू होती. त्या युवतीची आधी वरोरा येथील युवकासोबत मैत्री होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यावरून आत्महत्या करण्यापूर्वी अमरावती व वरोरा येथील युवक या दोघांमध्ये वाद सुरू होता. असे गाडगेनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

आत्महत्येपूर्वी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वरोरा येथील युवकाची समजूतदेखील काढली होती. त्यांच्यातील वाद वाढत गेला. त्यातून वरोऱ्याच्या युवकाने अमरावतीच्या युवकास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचा आरोप आहे.

वरोरा येथील युवकाच्या भीतीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या पालकांनी तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी वरोरा येथील युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here