दुर्गापूरात पुन्हा हत्येचा थरार, प्रेयसीच्या वडिलांची निर्घृण हत्या

50

दुर्गापूरात पुन्हा हत्येचा थरार,
प्रेयसीच्या वडिलांची निर्घृण हत्या

दुर्गापूरात पुन्हा हत्येचा थरार, प्रेयसीच्या वडिलांची निर्घृण हत्या

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 13 डिसेंबर
शहरालगतच्या दुर्गापूर येथे पुन्हा एकदा हत्याकांड घडले आहे. प्रेमात क्रोधाने जागा घेतली की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. मृतकाची मुलगी आरोपीवर प्रेम करत होती. मात्र, तिचा बाप प्रेमात अडसर येत होता. आरोपीने प्रेयसीच्या वडीलाचाच काटा काढीत चक्क गळाच चिरुन टाकला. ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मृतकाला घरातून प्रेमाने बोलावून नेले. व तिथेच बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने हत्या केल्याची चर्चा आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर एकाची गळा चिरुन हत्या केल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या अगदी 200 मिटर अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत उर्जानगर भवनात आरोपी प्रथम वाढई वय 21 वर्ष याने विकास गणविर (वय 47 वर्ष) यांची धारधार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. विशेष म्हणजे घटनेच्या एक दिवसापूर्वी आरोपी हा मृतकाच्या घरी कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी गेला होता. मात्र वेळीच पोलीसांनी आरोपीच्या हातातून कुऱ्हाड घेऊन प्रकरण शांत केले. मात्र आरोपीच्या मनातील क्रोध शांत झाला नव्हता. त्यामुळे आज त्याचा वचपा काढल्याची चर्चा आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे अधिक तपास करीत आहेत.